चाळीसगाव येथे शासकीय अनुदानाबाबत मार्गदर्शन कार्यशाळा

0566de44 99e2 4296 b040 f193bb826792

 

चाळीसगाव (प्रतिनिधी) डायनामिक्स लिगल आणि फायन्यांशिअल कन्सल्टंटस प्रा.लि.,चाळीसगाव को-ऑप इंडस्ट्रिअल इस्टेट लिमीटेड व चाळीसगाव अकौंटंट असोशिएशन यांच्या संयुक्त विदयमानाने ‘उदयोजक विकास कार्यक्रम’ अंतर्गत शासकीय अनुदानाबाबत मार्गदर्शन कार्यशाळा हॉटेल अन्नपूर्णा रेसिडन्स, चाळीसगाव येथे आयोजित करण्यात आली होती.

 

चाळीसगाव एमआयडीसीतील उद्योजकांना अधिक विस्तृत माहिती देण्यासाठी तसेच शंकांचे निरसन करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी चाळीसगाव को ऑप इंडस्ट्रिअल इस्टेट लिमीटेडचे चेअरमन संजय पवार, अकोंटंट असोशिएनचे अध्यक्ष महेश देशपांडे,उदयोजक महेंद्र जैन, सिए. रविंद्र छाजेड व सदर कार्यकमाचे मार्गदर्शक व्याख्याते डिलएफसी कंपनीचे एक्सपर्ट सिए विरेंद्र छाजेड आदि मान्यवर उपस्थित होते. महेंद्र जैन यांनी डिलएफसी कंपनीच्या मार्गदर्शनाचा सवलती व अनुदानाबाबत माहिती दिली. संजय पवार यांनी उद्योगाच्या भरभराटीसाठी वीरेंद्र छाजेड यांचे मार्गदर्शन घ्यावे व चाळीसगाव शहराला औद्योगिक नगरीचा दर्जा मिळवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले. दरम्यान, या कार्यकमास चाळीसगाव व्यापारी असोशिएनचे अध्यक्ष प्रदिप देशमुख यांनी धावती भेट देवुन कार्यकमास शुभेच्छा दिल्या. मुख्य मार्गदर्शक सिए विरेंद्र छाजेड यांनी एमआयडीसीत उद्योग उभारणी कसा उभारावा,प्लॉट हस्तांतरण कसे होते त्याचे नियम आदींची सविस्तर माहिती दिली. सुत्रसंचालन धनश्री महाले यांनी तर आभार महेश देशपांडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी डायनामिक्स लिगल आणि फायन्यांशिअल कन्सल्टंटस प्रा.लि.,चाळीसगाव को-ऑप इंडस्ट्रिअल इस्टेट लिमीटेड व चाळीसगाव अकौंटंट असोशिएशनचे सर्व पदाधिकारी सदस्य व कर्मचारी यांनी कामकाज पहिले.

Protected Content