यावल तालुक्यात रोजगाराच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी सक्रीय

3Frauds

 

यावल( प्रतिनिधी) तालुक्यात विविध ठिकाणी तरुणांना रोजगार मिळुन देण्याच्या नावाखाली आर्थिक लुट करून फसवणुक करणारी टोळी सक्रीय झाली असल्याचे उघड झाले आहे. या टोळीने तरुणांची लाखो रुपयांत लुट केली असल्याचे वृत समोर आले आहे.

पुणे येथील एका कंपनीने आगामी काही दिवसात प्लास्टीकच्या पिशव्या कायमच्या बंद होणार असुन यापुढे आता कागदांच्या पिशव्याच वापरात येणार आहेत, असा प्रचार करीत अशा पिशव्या बनवण्याच्या व्यवसायाचे आमिष तरुणांना दाखवून त्याबाबतचे प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली शहर व तालुक्यातील सुमारे ५०० बेरोजगार तरुणांकडून आणि विविध बचत गटात सहभागी असणाऱ्या महिलांकडुन प्रत्येकी ६५० रुपये याप्रमाणे सुमारे पाच लाख रुपये गोळा करून पळ काढला असल्याचे वृत आहे. या टोळीमध्ये तरूण, तरुणी व महिला अशा पाच ते सहा जणांचा समावेश असल्याचे समजते. या टोळीकडून जिल्ह्यात इतर ठिकाणीही कुणाची फसवणुक केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या टोळीचा शोध घेणे व त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच जनतेनेही सावधगिरी बाळगून आपली फसवणूक होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.

Protected Content