सचिन चौधरींसह सात जणांविरूध्द दंगलीचा गुन्हा

भुसावळ प्रतिनिधी । डीजे बंद केल्यावरून झालेल्या वादात पाच जणांना मारहाण केल्याने, बाजार समितीचे सभापती सचिन संतोष चौधरी यांच्यासह सात जणांविरुद्ध रविवारी दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, शनिवारी रात्री हळदीत लावलेला डिजे बंद केल्यावरून वाद झाले. यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन संतोष चौधरी तसेच जयेश संतोष चौधरी यांच्यासह सात जणांनी लोकेश चौधरी याच्यासह अन्य चार जणांना फायटरने मारहाण केली. यामध्ये सुनीता चौधरी, नीलेश सुधाकर चौधरी (वय ३६), लोकेश रवींद्र चौधरी (वय २२), ललीत शंकर चौधरी (वय २६), भूषण शंकर चौधरी (वय २८) व शंकर शिवराम चौधरी (रा.सर्व शनी मंदीर वॉर्ड, भुसावळ) हे जखमी झाले. जखमींना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी सचिन चौधरी व जयेश चौधरी यांच्यासह सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content