गटारी व कचराकुंडी तुडूंब भरल्याने पारोळेकरांचे आरोग्य धोक्यात

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरातील नगर परिषद कार्यक्षेत्रातील विविध भागात गटारी व नाल्यामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असुन यामुळे या परिसरात डासांचा उपद्रव वाढला असल्याने नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. नगर परिषद प्रशासनाने तात्काळ युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवुन घाणीचे साम्राज्य संपुष्टात आणावे अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे .

पारोळा शहरातील विस्तारीत झालेल्या नगर व अन्य कार्यक्षेत्रात विविध ठिकाणीच्या गटारी या दुर्गंधीयुक्त घाणीच्या पाण्याने व कचऱ्याने तुंबुन भरलेल्या असून, या गटारींची सफाई न झाल्याने त्या ठीकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असुन, दुर्गंधीचे प्रमाण वाढल्याने डासांचा उपद्रव वाढवा असुन, यामुळे नागरीकांचे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. आझाद चौकातील मुतारीच्या बाजूला असलेल्या मोठया गटारी मध्ये गेल्या अनेक दिवसांपासुन दुर्गंधीचा कचरा साचल्याने घाणीचे पाणी वाहण्यास अडचण निर्माण होवुन या ठीकाणी येणाऱ्या नागरीकांना व परिसरातील राहणाऱ्या नागरीकांना या दुर्गंधी सामना करावा लागत असुन , दरम्यान पावसाळा एका महीन्यावर येवुन ठेपला असुन, पावसाळ्या आदी जर हा नाला व गटारीची सफाई न झाल्यास नागरीकांना अनेक आरोग्या विषयी समस्यांना सामोरे जावे लागेल , तरी नगर परिसदच्या आरोग्य प्रशासनाने नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेवुन पावसाळ्या आदी तरी नाला व गटारी स्वच्छ कराव्यात अशी शहरातील नागरिकांकडून मागणी होत आहे .

Protected Content