धक्कादायक : दोन मित्रांना दमदाटी करून लुटले !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील अष्टभुजा देवी मंदीरासमोरील रोडवर दोन मित्र उभे असतांना दुचाकीवर आलेल्या अज्ञात दोन जणांनी शिवीगाळ करत दोघांकडून ३० हजार ५०० रूपयांची रोकड आणि २ हजार रूपयांचा मोबाईल असा एकुण ३२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना रविवारी २८ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी सोमवारी २९ एप्रिल रोजी रात्री १० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिपक देवीदास धनगर वय ३३ रा. अकुलखेडा ता.चोपडा हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दिपक धनगर आणि त्याचा मित्र गणेश असे दोघेजण रविवारी २८ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील अष्टभुजा देवी मंदीराजवळ उभे होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या अज्ञात दोन जणांनी त्याच्याजवळ येवून शिवीगाळ करून दमदाटी केली. यातील दिपक धनगर याच्याजवळील २९ हजारांची रोकड आणि गणेश जवळील दीड हजार व मोबाईल असा एकुण ३२ हजार ५०० रूपये किंमतीचा ऐवज जबरी हिसकावून चोरी नेला. ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी २९ एप्रिल रोजी रात्री १० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दोन जणांविरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव हे करीत आहे.

Protected Content