बापरे : हौसिंग सोसायटीतून विद्यार्थ्यांचे १० मोबाईल लांबविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शाहू नगर येथील सहयोग हौसिंग सोसायटीमधील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे तब्बल १० मोबाईल चोरून नेल्याची धक्कादायक घटना रविवारी २८ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी सोमवारी २९ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील शाहू नगर येथील सहयोग हौसिंग सोसायटीत भुषण राजेंद्र ठाकरे रा. वटार ता. चोपडा या तरूणासह इतर त्यांचे सहकारी मित्र वास्तव्याला आहे. रविवारी २८ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घराचे दरवाजे उघडे ठेवून सर्वजण झोपलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खोलीतून भूषण ठाकरे यांच्यासह इतर विद्यार्थ्यांचे ७० हजार रूपये‍ किंमतीचे १० मोबाईल चोरून नेल्याचे समोर आले आहे. ही घटना उघडकीला आल्यानंतर सर्वांनी शोधाशोध केली परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर विद्यार्थ्यांनी सोमवारी २९ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार सुनिल पाटील हे करीत आहे.

Protected Content