वनजमीन विक्री प्रकरणात फसवणूक करणाऱ्या ठाकूरचा जामीन अर्ज फेटाळला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कंडारी येथील वनजमिनीचे बनावट कागदपत्रे तयार करुन त्यांची विक्री केरीत फसवणूक केल्याप्रकरणी अटक असलेल्या मुकुंद बलबीरसिंग ठाकूर याने दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

मुकुंद ठाकूर याने इतरांच्या मदतीने कंडारी, ता. जळगाव शिवारातील गट नंबर ३७५ या वनविभागाच्या मालकीच्या जमिनीचे बनावट कागदपत्रे तयार करून भूमीहीनांना शासकीय नजराणा भरुन शासन जमीन देणार आहे, अशी खोटी बतावणी केली होती. तसेच भूमिहीन साक्षीदारांचे सात बारा उताऱ्यावर नावे लागल्याचे खोटे व बनावट सातबारे उतारे तयार करुन ते खरे असल्याचे भासवत बनावट खरेदीखत तयार केले होते.

यात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा घडल्यापासून फरार असलेल्या ठाकूरला १६ सप्टेंबर २०२३ रोजी अटक करण्यात आले. त्यानंतर ठाकूर याने जामीनसाठी जळगाव सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. यावर सत्र न्यायाधीश जे.जे. मोहिते यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकारपक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता रमाकांत सोनवणे यांनी काम पाहिले.

Protected Content