नितीन विसपुते यांना भोपाळ येथे पीएचडी पदवी प्रदान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मानसतज्ज्ञ नितीन विसपुते यांना उत्तर प्रदेशातील मथुरा येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय हिंदी विद्यापीठातर्फे भोपाळ येथे झालेल्या एका कार्यक्रमात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे विविध स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.

नितीन विसपुते हे चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक असून त्यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे. मानसशास्त्र आणि समाजकार्य यात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल तसेच समाजात वाढत चाललेली व्यसनाधीनता या विषयावर उल्लेखनीय अभ्यास केल्याबद्दल त्यांना विद्यावाचस्पती (पीएचडी) प्रदान करण्यात आली.

भोपाळ येथे झालेल्या या कार्यक्रमात सेवानिवृत्त न्यायाधीश देवेंद्र कुमार जैन, मुख्यमंत्री उदय योजनांचे प्रदेश प्रभारी विष्णुकांत कनकने, विद्यापीठाचे कुलपती डॉ. इंदुभूषण मिश्रा, दीपा मिश्रा, डॉ. विश्वनाथ पाणिग्रही या मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. याबद्दल त्यांचे जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, डॉ. राजेंद्र भालोदे, चेतना विसपुते, प्रवीण पाटील, निलेश काळे, आनंद चौधरी यांनी अभिनंदन केले आहे.

Protected Content