मंडळ अधिकार्‍यांना धक्काबुक्की करणार्‍या चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कर्तव्यावर असणार्‍या महिला मंडळ अधिकार्‍यांना धक्काबुक्की करून धमकावणार्‍या चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

या संदर्भातील माहिती अशी की, यावल तालुक्यात दोन दिवसापुर्वी वढोदे शिरसाड रस्त्यावर विनापरवाना वाळू वाहतुक करीत कर्तव्यावर हजर असलेल्या बामणोद क्षेत्राच्या महिला मंडळ अधिकारी यांना शिवीगाळ व धक्काबुकी करीत विनयभंग करून जिवे ठार मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला होता.

३१ ऑगस्ट २०२३रोजी दुपारी १२ , १५ वाजेच्या सुमारास बामणोद येथील मंडळ अधिकारी व थोरगव्हाणच्या पर्यवेक्षक म्हणुन कार्य सांभाळणार्‍या बबीता सुधाकर चौधरी या कर्तव्यावर असतांना वढोदे गावाजवळ विनापरवाना अवैधरित्या वाळुची वाहतुक करतांना विना क्रमांकाचे ट्रॅक्टर आढळुन आल्याने मंडळ अधिकारी यांनी ट्रॅक्टरला थांबवुन वाळू वाहतुकीचा परवाना मागीतला होता. यावर उपस्थितांनी महीला अधिकार्‍यांशी हुज्जत घालुन त्यांना शिविगाळ करीत धक्काबुकी करीत विनयभंग करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती.

 

या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. याबाबत यावल पोलीस ठाण्यात मंडळ अधिकारी बबीता चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता .

दरम्यान, पोलीस उपगिरिक्षक सुनिल मोरे व त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचारी यांनी तपासचक्र वेगाने फिरून या गुन्ह्यातील संशयीत आरोपी निलेश समाधान सोनवणे ( वय२० वर्ष , राहणार थोरगव्हाण), गोविंदा वना माळी (वय २४ वर्ष राहणार साकळी ); मयुर प्रकाश कोळी, (वय २३वर्ष राहणार शिरसाड ) आणी अजय दिलीप भालेराव (वय २३ वर्ष राहणार थोरगव्हाण तालुका यावल) यांना वेगवेगळ्या ठिकाणाहुन पाच लाख रुपये किमतीच्या स्वराज्य कपनीच्या  ट्रॅक्टरसह पोलीसांनी अटक केली आहे.

Protected Content