आरोग्य कर्मचारी संघटना महिला हक्क समितीच्या उपाध्यक्षपदी सुवर्णा धनगर यांची निवड

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । संत गजानन महाराज नगरी शेगाव येथे महाराष्ट्र राज्य जि.प.आरोग्य कर्मचारी संघटनेची केंद्रीय राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच घेण्यात आली. राज्य कार्यकारणीच्या महिला हक्क संरक्षण समितीवर जळगाव जिल्ह्यातील संघटनात्मक काम करणाऱ्या सुवर्णा धनगर यांची (महिला राज्य उपाध्यक्ष) म्हणून निवड करण्यात आली सुवर्णा धनगर ह्या उपक्रमशिल आदर्श शिक्षक अे.बी.धनगर (वि.या.पाटील माध्यमिक विद्यालय करणखेडा ता. अमळनेर) यांच्या पत्नी आहेत.

बैठकीत राज्याध्यक्ष शिवराज जाधव तसेच कोषाध्यक्ष पुरुषोत्तम वैष्णव, महिला सरचिटणीस, श्रीमती निकम, राज्य कार्याध्यक्ष वसंत बैसाणे साहेब, सहाय्यक गट विकास अधिकारी अजय चौधरी तसेच बुलढाणा जिल्हा कार्यकारणीच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातून सर्व जिल्हा पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.

बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून निर्णय पारित करण्यात आले. सर्वांना संबोधित करत असताना राज्याध्यक्ष शिवराज जाधव यांनी विविध विषयांवर चर्चा करून आपले परखड मत व्यक्त केले.आणि सर्वांनी एकमताने त्यांना पाठिंबा दिला तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला.

सुवर्णा धनगर यांची राज्य महिला उपाध्यक्षपदी निवड झाल्याने जळगाव जिल्ह्यातील योगेश सनेर,मंगेश बोईटे, संचालक ग स सोसायटी जळगाव, तुषारदादा बोरसे संचालक माध्यमिक सोसायटी जळगाव तसेच साने गुरुजी पतपेढी अमळनेर, सुशील सोनवणे अध्यक्ष धन्वंतरी जि.प. कर्मचारी सोसायटी जळगाव, डी. ए. धनगर,  वसंत बैसाणे, संजय पाटील, जितेंद्र मोरे, अजित बाविस्कर, प्रेमलता पाटील, अजय चौधरी, एन.एस. पवार, कुणाल पवार, राकेश शिंपी, सुनील ढाके, ज्ञानेश्वर पाटील, देवेंद्र पाटील, वहिदाबी खान, अरुणा सूर्यवंशी, सुवर्णा भोपे तसेच विविध संघटना व त्यांचे पदाधिकारी आदींनी शुभेच्छा दिल्या.

Protected Content