आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस

The winter session will begin tomorrow

नागपूर वृत्तसंस्था । शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर विधीमंडळाचे पहिले अधिवेशन सुरू असून आज या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. या पहिल्या अधिवेशनामध्ये विरोधक भाजपने सत्ताधाऱ्यांना चांगलाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आज शेवटच्या दिवशी विरोधक आक्रमक राहण्याची शक्यता आहे.

अवकाळग्रस्त शेतकरी मुद्द्यावर विरोधक सरकारला पुन्हा घेरण्याच्या तयारीत आहेत. अवकाळग्रस्त शेतकरी मुद्द्यासह नदी जोड प्रकल्प, राज्यातील पाणी पुरवठा योजना, शेतकरी कर्जमाफी, वाढती गुन्हेगारी या मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरू शकतात. सभागृहात मंजूर करून घेतलेल्या पुरवण्या मागण्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच विरोधक मतदानाची मागणी करू शकतात. विदर्भातील विविध विकास प्रकल्पे व त्यांची सद्यस्थिती वर आज सभागृहात नियम 293 अंतर्गत चर्चा होईल. महानगर पालिका सुधारणा विधेयक गुरुवारी मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान सभेत सादर केले. या सुधारणा विधयेक अंतर्गत महापालिकेतील प्रभाग पद्धती रद्द होऊन एक सदसीय वॉर्ड पद्धती अस्तित्वात येणार आहे. हा अधिनियम परिषदेत सादर करून दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात येणार. तसेच नागरिक्तव सुधारणा कायद्या विरोधात आजही नागपूरात मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे, दुपारी हा मोर्चा विधान भवनावर धडकणार आहे.

Protected Content