जिल्हा दूध संघासाठी भाजप-बाळासाहेबांच्या शिवसेनेची खलबते !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा सहकारी दूध संघाच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या नेत्यांची खलबते सुरू असून याबाबत लवकरच अधिकृत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याला आता दोन दिवस उरले असतांनाही चित्र स्पष्ट होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या अनुषंगाने आज ना. गिरीश महाजन यांच्या जी.एम. फाऊंडेशनच्या जनसंपर्क कार्यालयात आज भाजप आणि शिंदे गटाची खलबते सुरू आहेत.

भारतीय जनता पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, आ. मंगेश चव्हाण, आ. संजय सावकारे, माजी आमदार स्मीता वाघ तर शिंदे गटातर्फे आमदार चिमणराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील आदी नेते बैठकीला पोहचले आहेत. यामुळे लवकरच युतीच्या पॅनलबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content