चोरीच्या दुचाकीसह दोघे जेरबंद; एलसीबीची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील दुचाकीची चोरी करणारे दोन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज अटक केली आहे. दोघांकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, जामनेर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपीचा शोध घेण्याकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील, अशोक महाजन, अनिल इंगळे, अनिल इंगळेख्‍ अनिल देशमुख, कमलाकर बागुल, रमेश चौधरी, प्रदीप पाटील, जयंत चौधरी, दिपक चौधरी यांनी आज जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथे सापळा रचून संशयित आरोपी सनि अशोक बाविस्कर आणि अनिकेत कडुबा चौथे रा. पहूर कसबे ता.जामनेर जि.जळगाव यांना अटक केली. त्यांच्याकडून एक चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे. दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून जामनेर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content