जागतिक मधुमक्षिका दिनानिमित्ताने ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन

चाळीसगाव, प्रतिनिधी ।  कृषी विज्ञान केंद्र जळगाव यांच्या वतीने जागतिक मधुमक्षिका दिनानिमित्ताने ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

जागतिक मधुमक्षिका दिन ऑनलाईन कार्यक्रमाचे  प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर  आणि अध्यक्ष म्हणून तेलबिया संशोधन केंद्र जळगाव प्रमुख शास्त्रज्ञ  डॉ. सुदाम पाटील  हे उपस्थित होते. संभाजी ठाकूर यांनी सर्व शेतकरी बांधवांना आजच्या दिनाचे महत्त्व सांगितले.  पोकरा व राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत वैयक्तिक शेतकरी किंवा गटाने मधुमक्षिका पालन सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यात येते. याचा शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. सुदाम पाटील यांनी मधमाशी कशा पद्धतीने शेतकऱ्यांना व शेतीव्यवसायाला मदत करते याविषयी सांगितले. सोबतच सर्वांनी आपल्या आहारामध्ये मधाचे सेवन करावे असे सांगितले. प्रमुख वक्ते  विद्यानंद आहिरे  यांनी शेतकऱ्यांना विविध मधमाशांच्या जातींची ओळख करून दिली. तसेच दृष्ट्या तांत्रिकदृष्ट्या कशा पद्धतीने मधमाशांचे संगोपन करावे याविषयी सादरीकरण केले. मंगेश महाले यांनी शेतकऱ्यांनी मधमाशांचा वावर आपल्या शेतामध्ये वाढवावा यासोबतच मधमाशांचे कृषी उत्पादनातील महत्व संवर्धनाचे उपाय याविषयी सादरीकरण केले.  प्रास्ताविक डॉ. हेमंत बाहेती यांनी केले.  संयुक्त राष्ट्र संघ यांनी मधमाशांचा साठी 20 मे जागतिक मधुमक्षिका दिन म्हणून 2018 मध्ये याची सुरुवात केली तेव्हापासून प्रत्येक वर्षी विविध सदस्य देशांमध्ये या दिनानिमित्त लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. डॉ. बाहेती यांनी सर्व शेतकऱ्यांचे प्रश्नोत्तराच्या सत्रांमध्ये शंकानिरसन केले.आजच्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये विविध स्तरावरील विस्तार कार्यकर्ते शेतकरी व ग्रामीण युवक या सर्वांनी सहभाग कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विशाल वैरागर आणि आभार  इजी. वैभव सूर्यवंशी यांनी मानले. 

Protected Content