आसोदा रेल्वे गेटवर वाहतूकीची कोंडी; वाहतूक निपटाऱ्यासाठी रेल्वे अर्धा तास थांबून

railway accident

जळगाव प्रतिनिधी । शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे शिवाजीनगर येथील रहिवाशी आणि यावलकडून येणाऱ्या वाहनांना पर्यांयी रस्ता नसल्यामुळे आसोदा रोड रेल्वे गेट आणि सुरत रेल्वे गेट मोठ्या प्रमाणात आज सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास वाहतूकीची कोंडी झाली होती. दरम्यान ममुराबाद रेल्वे पुल बंद वाहतूकीसाठी बंद असल्यामुळे नागरीकांना येण्याजाण्यासाठी आसोदा रेल्वे पुलच्या व्यतिरिक्त पर्यायी रस्ता नसल्याने आज सायंकाळी पासून ते रात्री उशिरापर्यंत वाहतूकीचा पुर्णपणे खोळंबा झाला होता. वाहतूकीच कोंडी थांबविण्यासाठी चक्क दोन रेल्वे अर्धा तास थांबविण्यात आला होता.

दोन्ही बाजूच्या दोन रेल्वे अर्धा तास थांबून
ममुराबाद रेल्वे गेट, शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुल पुर्णपणे बंद झाल्याने आसोदा रेल्वे गेटवर सायंकाळी चार वाजेच्या सुमारा दोन्ही बाजूने प्रचंड वाहतूकीची कोंडी झाली होती. तर रेल्वे गाड्या दर दहा मिनीटाला येत असल्याने वारंवार रेल्वे गेट बंद करावे लागत होते. एक वेळ अशी आली की सायंकाळी 7.15 वाजेच्या सुमारास भुसावळकडून येणारी रेल्वे गाडी चक्क अर्धातास थांबविण्यात आली होती. रेल्वे गेटमध्ये अडकलेल्या दुचाकी व इतर वाहने काढण्यात आली. हा प्रकार पुन्हा रात्री 8 वाजता झाला जळगावकडून रेल्वे मालगाडी येत असतांना रेल्वे गेटमधून वाहतूक कमी होत नसल्याने मालगाडी देखील अर्धातास थांबविण्याचा प्रकार झाला आहे.

ममुराबाद रेल्वे पुल बंद
ममुराबद रेल्वे पुलाचे काम बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. तो रस्ता देखील काम अजून पर्यंत पुर्ण झाली नाही. आता सध्याला पाईपलाईन टाकून रस्ता बनविण्यात येत आहे. त्यामुळे हा रस्ता पुर्णपणे वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.

सुरत रेल्वे गेट
शिवाजी नगरातील रहिवाशी यांना सुरत रेल्वे गेट हा पर्यायी रस्ता असल्यामुळे दुचाकी, चारचाकी, अवजड वाहने, बसेसची वाहतूक याच रेल्वे गेटवरून होत आहे. त्यामुळे नागरीकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान अश्याची परिस्थितीमुळे काल दुपारी उपचारासाठी जात असलेल्या महिलेचा वेळेच उपचार न मिळाल्याने सायंकाळी मृत्यू झाला होता. यावेळी देखील नागरीकांचा प्रचंड संताप व्यक्त होत होता.

प्रशासनाचा नाकर्तेपणा व दुर्लक्ष
दररोज या ठिकाणाहुन शिवाजीनगरातील रहिवाशांसह परिसरातील गावांमधुन सुमारे १० हजार वाहनधारक ये-जा करित असतात. सुरत गेट हा एकच पर्यायी मार्ग असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने तहसिल कार्यालयाजवळ पर्यायी रस्ता उपलब्ध करुन देण्याची मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे. यामुळे पादचाऱ्यांना व आपत्कालीन परिस्थितीसाठी हा मार्ग सोयीस्कर ठरणार आहे. पूलाचे काम दोन वर्ष चालणार असल्याने, रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी तात्पुरते गेट उभारण्यासाठी रहिवाशांना न्यायालयाचे देखील दार ठोठावे लागले आहे. रेल्वे प्रशासनाने पर्यायी रस्त्याची मागणी फेटाळुन लावल्याने, शिवाजीनगरातील हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांना स्व:त पैसे खर्च करुन, न्यायालयात याचिका दाखल करावी लागली.

Protected Content