वन कर्मचाऱ्यांवर जमावाचा हल्ला; यावल पोलीसात गुन्हे दाखल

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वन कायद्याच्या अंतर्गत दाखल गुन्ह्यातील फरार संशयितांना पकडण्यासाठी गेलेल्या वनरक्षकांवर जमावाने हल्ला करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार पैझरीपाडा गावात घडला. प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात १२ जणांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, “यावल वन कायद्यान्वये दाखल गुन्ह्यात संशयित आरोपी कैलास वेरसिंग बारेला रा. काळाडोह ता. यावल याला अटक करण्यात आली होती. त्याला वनकोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, त्याची वन अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली असता त्याने या गुन्ह्यात असलेल्या इतर फरातर आरोपींची नावे सांगितले.

त्यानुसार १७ ऑगस्ट रोजी सकाळी यावल वनविभागाचे विक्रम तुळशीराम पदमोर, रविंद्र पंडीत तायडे, प्रकाश वाहऱ्या बारेला, गोवर्धन बब्रुवान, जीवन बालाजी नागरगोजे, सारंग यशवंत आढाळे, वाहनचालक महेश अशोक चव्हाण आणि कृष्णा पांडूरंग शेवाळे असे आठ जण फरार आरोपींना पकडण्यासाठी पैझरीवाडा येथे गेले.

त्याठिकाणी फरार आरोपी एका मंदीरावर झोपलेले असतांना वनअधिकारी व कर्मचारी यांनी पकडले. यात फरार आरोपींना पकडल्याने गावातील महिला व काही जणांनी लाठ्या काठ्या घेवून वनअधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. यातील एकाने वन अधिकाऱ्यांना जीव ठार मारण्याची धमकी दिली. अचानक केलेल्या हल्ल्यामुळे सर्व वनअधिकारी व कर्मचारी यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेतली.”

याच्यावर झाला गुन्हा दाखल –

वनरक्षक कृष्णा शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रंगी रामसिंग पावरा, सुरेश किसन पावरा, जामसिंग मखना बारेला, बिलरसिंग जामसिंग बारेला, प्यारसिंग जामसिंग बारेला, सखाराम जामसिंग बारेला, ईना कमरा बारेला, सिता सखाराम बारेला, रशिदा जामसिंग बारेला, मंजूराबाई सुरेश बारेला, सावळीबाई कमरू बारेला, व्यापारीबाई तुळशीराम बारेला यांच्यासह इतर १० ते १५ जण सर्व रा. पैझारीपाडा ता. यावल यांच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content