अमळनेर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी उत्साहात साजरी

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह अमळनेर येथे जाहीर व्याख्यान व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण सोहळा दिमाखदारपणे संपन्न झाला.

महेश्वर, मध्यप्रदेश नगरपरिषद नगराध्यक्ष अमिता जैन यांच्या अध्यक्षतेखाली खाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विचारमंचावर प्रमुख वक्ते प्रा. अर्जुन जाधव उस्मानाबाद, नागरी हित समितीचे अध्यक्ष प्रा.अशोक पवार, साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे, लोकसंघर्ष मोर्चाचे अध्यक्ष प्रतिभा शिंदे, महेश्वरचे सामाजिक कार्यकर्ते हेमंत जैन, राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष बन्सीलाल भागवत, पुरस्कारार्थी लोक संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष प्रतिभा शिंदे, बहुउद्देशीय आधार केंद्राच्या अध्यक्ष डॉ. भारती पाटील, सामाजिक क्षेत्रात सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. सुषमा जोशी, शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती शिरपूर डॉ. नीता सोनवणे, समाजभूषण ज्ञानेश्वर कंखरे विराजमान होते.            

याप्रसंगी प्रा.अशोक पवार, संदीप घोरपडे, हेमंत जैन यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई पुरस्काराचे वितरण शाल,घोंगडी, पगडी, काठी श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी प्रा.अर्जुन जाधव यांनी पुण्यश्लोक अहिल्यामाई जीवनपट आपल्या ओघळत्या शैलीतून उभा केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा महेश्वर नगरीच्या नगराध्यक्ष अमिता जैन यांनी, “अहिल्यादेवी म्हणजे एक प्रेरणा स्त्रोत आहे. कर्तव्य आणि कर्तबगारीचा एक ठेवा आहे. त्यांच्या कार्याचा वारसा घेऊन आम्ही चाललोय भावी पिढीला हा वारसा लाभो. पुन्हा पुन्हा घरात घराघरात पुण्यश्लोक अहिल्यामाई, जिजाऊ माता, सावित्रीबाई फुले जन्माला यावेत.” या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

अहिल्यादेवींची रांगोळीतून साकारलेली प्रतिमा आणि मानस पाटील याने महेश्वरची हुबेहूब तयार केलेली प्रतिकृती उपस्थितींचा आकर्षणाचा विषय होता. सुमरान या धनगरी बाणाच्या गीताला भंडारा उधळत भरभरून दाद दिली.

कार्यक्रमाची प्रस्तावना बन्सीलाल भागवत यांनी केली. सूत्रसंचालन एस. सी. तेले व कविता मनोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डी. ए. धनगर यांनी केले.  यावेळी युवा मल्हार सेनेचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब खेमनार, टीचर असोसिएशनचे अध्यक्षा शुभांगी पाटील, राजे मल्हार होळकर प्रतिष्ठान, अमळनेर धनगर समाज, मौर्यकांती संघ, युवा मल्हार सेना, अमळनेर यांनी मौर्य क्रांती जिल्हाध्यक्ष रमेश देव शिरसाठ युवा, मल्हार सेना उत्तर महाराष्ट्र प्रमुख देवा लांडगे, हिरामण कंखरे, न.पा.शिक्षण मंडळ अध्यक्ष नितीन निळे, कवी रमेश पवार, हरचंद लांडगे, समाधान धनगर, प्रविण धनगर, मच्छिंद्र लांडगे, प्रा. दिनेश भलकार, आनंदा हडप, शशिकांत आढावे, प्रवीण धनगर, सुधाकर पवार, चेतन देवरे, रावसाहेब न्हाळदे, प्रा. मनोज रत्नपारखी, प्रा. जगदीश भागवत, प्रा.विजय शिरसाठ, निरंजन पेंढारकर सर, गोपाल हडपे, उमेश मनोरे, निखील बोरसे, गुलाबराव भागवत, जयप्रकाश लांडगे, गोपीचंद शिरसाट, विजय धनगर, आप्पा बागले, संजय धनगर, राजू धनगर, उपसरपंच आलेश धनगर, दादाभाई धनगर, दिनेश बागुल, उपसरपंच अंकुश भागवत, सरपंच दिलीप ठाकरे धानोरा,  भावलाल पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Protected Content