यावल येथील बेपत्ता मुलगी कुटुंबाच्या स्वाधीन ; पोलीसांचा सत्कार

यावल प्रतिनिधी । येथील धोबीवाडा परिसरात राहणाऱ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचे दीड वर्षापुर्वी शाळेतून अपहरण झाले होते. दरम्यान, उत्तर प्रदेश सारख्या राज्यातुन तिला शोधून सुखरुप कुटुंबाच्या स्वाधीन केले. या उत्कृष्ठ अशी उल्लेखनिय कामगीरीबद्दल पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले आणी त्यांचे सहकारी सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे यांचा आज लोकप्रतिनिधींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

दरम्यान यावल पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले आणी सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे यांनी मागील दिड वर्षापुर्वी शहरातील शाळेतुन अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन ट्विंकल कोळी हिचा मिळालेल्या माहीतीच्या आधारावर गौरखपुर जिल्ह्यातील बडहलगंज पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या देरवा चौक या नेपाल राज्याच्या  अगदी  सिमारेषेवर जवळ असलेल्या गावातुन शोध लावुन तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले. 

अशा धाडसी कर्तृत्वान व कार्यतत्पर पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले व त्यांच्या सोबत पथकात असणारे त्यांचे सहकारी विजय पाचपोळे यांचा यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते अतुल पाटील , माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले , माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक शेख असलम शेख नबी, सामाजीक कार्यकर्त गिरीष महाजन , गणेश भालेराव ( महाजन ) , हाजी फारूख शेख , एजाज देशमुख, राष्ट्रवादीचे कामराज घारू, सामाजीक कार्यकर्ते गणेश जोशी यांच्यासह आदी मान्यवरांनी या दोघ अधिकारी आणी बेपत्ता मुलीच्या शोधकार्यास मोलाचे मार्गदर्शन देवुन शोध कार्यास यशस्वी करणारे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांचे ही याप्रसंगी शाल पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आले.

 

Protected Content