श्री क्षेत्र मनुदेवी देवस्थान परिसरातील दुकानातील वस्तु व साहित्यांची चोरी

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी येथील परिसरातील ८ नोव्हेंबर रोजी रात्री चार ते पाच दुकानांमध्ये चोरी झाल्याची घटना घडली असून हजारो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे समोर आले आहे.

 

याबाबतची मिळालेली माहीती अशी की, यावल तालुक्यातील सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिर परिसरात वीस ते पंचवीस पूजासाहित्य खेळ खेळण्याची व इतर साहित्याचे दुकान असून, येथील नारायण पाटील, सिकंदर तडवी, सुरज तडवी, मोहन कोळी, संजय पाटील, गोपाळ पाटील व इतर चार ते पाच जणांचे दुकानात असलेले पूजेचे साहित्य खेळ खेळणे महाग वस्तू अशी हजारो रुपयांचे साहित्याची चोरी अज्ञात चोरट्यांनी रात्री चोरून नेले आहे. मनुदेवी मंदिर परिसरात जवळपास २० ते २५ दुकाने असून हे दुकानदार रोज सकाळी आपल्या दुकानांना सर्व सामान तिथेच व्यवस्थित ठेवून रात्री आपल्या घरी निघून जातात. सकाळी पुन्हा परत दुसऱ्या दिवशी दुकाने उघडतात . परंतु ८ नोव्हेंबर रात्री अज्ञात चोरट्यांनी परिसरातील ४ ते ५ दुकाने त्यात असलेला पूजेचे साहित्य व इतर सामान चोरून नेला. दुकानदार  मंगळवारी ९ रोजी सकाळी आपली दुकाने उघडली असता त्यांना आपली दुकानातून चोरी झाल्याचे समजले. दुकानदारांनी तात्काळ यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तशी तक्रार दिली आहे. दुकानांचे मिळणाऱ्या कमाईतून हे दुकानदार आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात.  ऐन दिवाळीच्या काळात त्यांनी आपल्या दुकानात भरपूर साहित्य जमा करून ठेवलेला होता चोरट्यांनी हेच साधून सदर चार ते पाच दुकानांमध्ये चोरी केल्याचे समजते . वारंवार या परिसरात चोऱ्यांचे प्रमाणात वाढत असुन पोलीस प्रशासनाने या विषयी दक्षता घ्यावी अशी मागणी नागरीक करीत आहे .

Protected Content