भुसावळात किरकोळ कारणावरून महिलेला मारहाण; तिघांविरोधात गुन्हा

भुसावळ प्रतिनिधी । किरकोळ कारणावरून महिलेला शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील तिघांनी शिवीगाळ व मारहाण करून जखमी केल्याची घटना ४ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोशनी संतोष मोरे (वय-३४) रा. गौतम नगर यांच्या शेजारी छायाबाई विक्रम नारखेडे हे राहतात. ३ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घरासमोरील कचरा गटारीत फेकला या संशयावरून संशयित आरोपी छायाबाई विक्रम वानखेडे, रितीका विक्रम वानखेडे आण विक्रम हरी वानखेडे यांनी रोशनी मोरे यांनी शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तर विक्रम वानखेडे यांनी रोशनी यांच्या लाकडी काठी डोक्यात मारल्याने गंभीर दुखापत केली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content