यावल येथे शब बारात, बालाजी रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांचे पथसंचलन

यावल प्रतिनिधी । कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात रद्द करण्यात आलेल्या श्री. बालाजी रथोत्सव आणि शब-ए-बारात निमित्त नमाज पठणाची पार्श्वभूमी लक्षात घेता शहरात पोलीसांच्या मदतीला एसआरपीला पाचारण करत गावातून पथसंचलन करण्यात आले.

गेल्या १० दिवसांपासून कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव प्रसार टाळण्यासाठी संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्यामध्ये संचारबंदी लागू झाली असून या संचारबंदीच्या काळात कुठलेही काम नसताना खेळणाऱ्या रिकामटेकड्याचा गोंधळ संचारबंदी लागू असलेल्या जमावबंदीचे आदेश आला. काही विशिष्ट ठिकाणी गर्दीत सातत्याने वाढत आहे. पोलीस निरीक्षक अरुण धनवडे हे आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह अतिशय दक्ष राहून चोखपद्धतीने आपले जीव धोक्यात घालून नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे.

यावल शहरात लागू करण्यात आलेली कोरोना संचारबंदी तसेच रद्द झालेले बालाजी रथोत्सवची यात्रा या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था सांभाळण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त म्हणून एसआरपीला करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गाने एसआरपी पथकाचे पथसंचलन करण्यात आले. यावेळी शहराच्या प्रमुख पथसंचलन करताना एसआरपीच्या पथकावर नागरिकांच्या वतीने फुल पाकड्यांची उधळण करण्यात आली. यावलचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, सपोनि जितेंद्र खैरनार यांनी मिळून सुरू असलेल्या संचारबंदीच्या काळात बंदोबस्तासाठी अतिशय उत्कृष्टकार्य करीत असल्याने समाजसेवक यांच्या माध्यमातून गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

Protected Content