लॉकडाऊनचा कालावधी वाढणार- पंतप्रधानांनी दिले संकेत

नवी दिल्ली वृत्तसंस्था । १४ एप्रिल रोजी लॉकडाऊन पूर्णपणे संपणार नसून याचा कालावधी वाढविण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.

नरेंद्र मोदींनी आज लोकसभा आणि राज्यसभेत पाचपेक्षा जास्त सदस्य असणार्‍या संसदेतील नेत्यांसोबत चर्चा केली. या बैठकीत काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल, तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंडोपाध्याय, शिवसेना नेते संजय राऊत, बीजेडीचे पिनाकी मिश्रा, बीएसपी नेता सतीश चंद्र मिश्रा, जेडीयूचे राजीव रंजन सिंह यांच्यासोबत इतर नेते उपस्थित होते.

यात सहभागी झालेले बिजू जनता दलाचे नेते पिनाकी मिश्रा यांनी या बैठकीत पंतप्रधानांनी १४ एप्रिल रोजी लॉकडाऊन पूर्णपणे उठणार नसल्याचे स्पष्ट केल्याची माहिती दिली. यावेळी नरेंद्र मोदींनी सर्वांना करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकार काय पावलं उचलत आहे यासंबंधी माहिती दिली. यावेळी नेत्यांनीदेखील नरेंद्र मोदींना राज्यांमध्ये निर्माण होणार्‍या समस्यांची माहिती दिली. तसंच त्यांचा सामना करण्यासाठी अजून संसाधने उपलब्ध करुन देण्याची विनंती केली.

Protected Content