कोरोना : उत्तर प्रदेशातील १५ जिल्हे आज मध्यरात्रीपासून पूर्णपणे बंद होणार

लखनौ (वृत्तसंस्था) कोरोना व्हायरसचे रुग्ण असलेले उत्तर प्रदेशातील १५ जिल्हे पूर्णपणे बंद करण्यात येणार आहेत. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

उत्तर प्रदेशातील १५ जिल्ह्यांमध्ये लॉकडाउनची अत्यंत कठोरतेने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने तसे आदेश दिले आहेत. आज मध्यरात्रीपासून पुढच्या १३ एप्रिलपर्यंत या लॉकडाउनची अत्यंत कठोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल. या १५ जिल्ह्यांमध्ये हालाचालींवर आणखी निर्बंध येणार आहेत. या काळात अत्यावश्यक सेवा पुरवण्यात येतील. दरम्यान, लॉकडाउन लागू होऊन १४ दिवस पूर्ण झाले आहेत.

Protected Content