दुचाकीचा रस्ता आडवत तरूणीवर अत्याचार

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरातील एका भागात राहणारी २९ वर्षीय तरूणीचा रस्ता आडवून मारहाण करत जबरी अत्याचार केलयाची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पारोळा पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पारोळा शहरातील एका भागात २९ वर्षीय तरूणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी ८ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता पिडीत तरूणी हा दुचाकीने शहरातून जात असतांना समाधान लोटन चौधरी रा. गांधी नगर, पारोळा याने तिचा रस्ता आडविला. त्यानंतर जबरी तिचा हात पकडून विनयभंग करत तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत तरूणीने पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी समाधान लोटन चौधरी याच्या विरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहे.

Protected Content