जामनेर येथे उघड्या घरातून मोबाईलसह टॅबची चोरी

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील सानगुरूजी कॉलनीत उघड्या घरातून अज्ञात चोरट्यांनी मोबाईलसह टॅब असा एकुण २६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी २६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गजानन संतोष साबळे (वय-४१) रा. साने गुरूजी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्याच्या दोन्ही मुलांचे परिक्षा असल्याने शनिवारी ८ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता घर बंद न असतांना शाळेत निघून गेले. त्यावेळी उघड्या घरातून अज्ञात चोरट्याने मोबाईल व टॅब असा एकुण २६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लांबविला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जयेंद्र पगारे करीत आहे.

Protected Content