लहान मुलांवरुन भांडण : सात जणांविरोधात दंगलीचा गुन्हा

यावल प्रतिनिधी । येथील बाबुजीपुरा परिसरात लहान मुलांच्या जुन्या भांडणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीत एका गटाकडून तलवारीने व लोखंडी पाईपने मारहाण केल्याच्या घटनेत तीन जण गंभीर  जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली. यावल पोलीसात ७ संशयीतांवर मारहाणीसह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की सोमवारी  सकाळी साडेदहाच्या ते अकरावाजेच्या सुमारास येथील बाबुजीपुरा परिसरात लहान  मुलांच्या  जुन्या  भांडणावरून दोन गटात  झालेल्या हाणामारीत  संशयीत  आरोपी तन्वीर अब्दुल याने  नईम जबीउल्लाखान याचे डोक्यात तलवार मारल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत तर सलीम बाबा यांनी  हातातील पाईप  रईस जबीउल्ला खान याचे पाठीवर खांद्यावर  मारल्याने जखमी झाले आहे.

यासह अन्य एक असे तीघेजण या हाणामारीत जखमी  झाले असुन प्रथम सर्व जख्मींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येवुन यातील गंभीर जख्मींना पुढील उपचारासाठी  जळगाव येथे   पाठवण्यात आले असुन , सईद जबीउल्ला खान यांनी दिलेल्या फिर्यादी वरून संशयीत आरोपी तन्वीर अब्दुल, तौकीफ  अब्दुल  सलीम,  अब्दुल  अजीज,  हमीद  अब्दुल  अजीज,  सैजात  अब्दुल हमीद,  शोएब अख्तर,  या सात जणांवर  मारहाणीसह  दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन. या गुन्ह्याचे पुढील  तपास पोलीस उपनिरिक्षक विनोद  खांडबहाले करीत आहेत

 

Protected Content