धरणगावात गरजु कुटुंबाना ‘खाद्यसामग्री किट’चे वाटप

 

धरणगाव , प्रतिनिधी । हलाखीची परिस्थिती, हात मजुरीवर अवलंबुन असलेले कुटुंब, लॉक डॉउनमुळे हाताला काम नाही , त्यामुळे अन्नधान्य घ्यायला पैसे नाही अशा गरजु कुंटुबाना आज धरणगावात जलदूत फाउंडेशन तर्फे ” खाद्यसामग्री किट ” वितरित करण्यात आले.

जलदूत फाउंडेशनतर्फे धरणगाव परिसरातील ३०० गरजु कुटुंबांना मदत करण्यात आली. जलदूत फाउंडेशनच्या कार्यात जर आपणास आर्थिक मदत करायची असल्यास फाऊंडेशन अकांऊट डिटेल्स देण्यात आले आहेत. फाऊंडेशन अकांऊट डिटेल्स पुढील प्रमाणे जळगाव जनता सहकारी बँक लि. शाखा धरणगाव, चालू खाते क्रं. -23021000341, IFSC – JJSB0000021. तसेच आपण 8085997577 या नंबर Google Pay, Phone pay  किंवा BHIM ID 8085997577@ybl   व्दारे देणगी द्यावी असे आवाहन जलदूत फाऊंडेशन तर्फे करण्यात आलेले आहे.

Protected Content