सुशांत आत्महत्या : अटकेच्या भीतीने रिया गायब ; खटला पाटणा येथून मुंबईत हलवण्यासाठी याचिका

मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती अटकेच्या भीतीने गायब झाली आहे. तर दुसरीकडे रियाच्या वकीलाने पाटणा येथे तिच्याविरोधात दाखल करण्यात आलेला खटला मुंबई पोलिसांकडे हस्तांतरित करण्यासाठी याचिका दाखल केली आहे.

 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पाटणा पोलिस तिचा शोध घेत असून तिच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याने रियाने हे पाऊल उचलले आहे. सुशांतचे वडील कृष्णा किशोर सिंह यांनी सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती आणि दोन व्यवस्थापक सौमिल चक्रवर्ती आणि श्रुती मोदी यांच्याविरोधात पाटणा येथील राजीव नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी रियाविरूद्ध अजामीनपात्र कलमही लावले आहेत. दरम्यान, बुधवारी पाटणा पोलिस चौकशीसाठी तिच्या पत्त्यावर पोचले होते. मात्र तिच्या घरी कुणीही हजर नव्हते.

Protected Content