धक्कादायक : बुलडाण्यातील ‘त्या’ मृत रूग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

बुलडाणा, प्रतिनिधी । ज्या गोष्टीची भीती होती, तीच आता बुलडाणेकरांच्या वाट्याला आली आहे. बुलडाण्यात काल मृत पावलेल्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सदर रुग्ण दोन दिवस शहरातील एका खाजगी रुग्णालयात भर्ती होता.

शनिवारी २८ मार्च रोजी खासगी रूग्णालयात जिल्हा रुग्णालयात त्याला हलविण्यात आले होते. तासाभराच त्याचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार येथील एका शाळेचे ४५ वर्षीय मुख्याध्यापक मागील काही दिवसांपासून आजारी होते. रूग्णाची कुठलीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसल्याचे समजते. अर्थात त्यांनी ती लपविली असावी असाही अंदाज तज्ञ डॉक्टर व्यक्त करत आहे. सदर शिक्षकाला येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शेवटच्या दोन दिवसांपर्यंत याच रुग्णालयात त्यांच्यावर उपचार झालेत पण परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने संबंधित रुग्णालय व्यवस्थापनाने या शिक्षकाला जिल्हा रुग्णालयात हलविले.

निमोनिया आणि डायबेटीस दोन्ही आजारांनी त्रस्त असलेला हा इसम जिल्हा रुग्णालयात एका तासातच मृत्यू पावला… धक्कादायक आणि चिंताजनक बाब म्हणजे त्याला आधी आयसोलेशन वॉर्ड आणि नंतर जनरल वार्डात हलविल्याचे सूत्रांकडून कळते. सदर व्यक्तीचे रिर्पोट नागपूरला पाठविण्यात आले होते. आज दुपारी त्याचा रिपोर्ट जिल्हा सामान्य रुग्णालयाला प्राप्त झाला. हा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बुलडाण्यासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आता खऱ्या अर्थाने लॉकडाऊन ची गरज निर्माण झाली आहे.

किती जण आले संपर्कात ? शोध सुरू
मागील 14 दिवसांपासून सदर व्यक्ती कोरोनाग्रस्त आहे. या दरम्यान त्याच्या संपर्कात किती जण आलेत, या कल्पनेनेच अनेकांच्या अंगावर काटा उभा राहू शकतो. त्याचे कुटुंबीय, शेजारी, नातेवाईक तसेच ज्या खाजगी रुग्णालयात तो भर्ती होता, तेथील डॉक्टर, नर्स तसेच जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर त्याला सेवा देणारे पथक, त्याच्या अंत्यसंस्काराला उपस्थित लोक असे अनेकजण आता होम क्वारंटाईन करण्याची गरज आहे.

Protected Content