चोपडा येथील प्रताप विद्या मंदिराच्या दहावीच्या निकालाची परंपरा कायम

चोपडा प्रतिनिधी । चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिराच्या परीक्षेच्या निकालात अमोल मुरलीधर पाटील ९७.६० टक्के मिळवीत संस्था व शाळेच्या उज्ज्वल यशाच्या परंपरेत पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवीत सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला. शाळेचा एकुण निकाल ९७.५३ टक्के निकाल लागला आहे. तर सहा तुकड्यांचा निकाल 100 टक्के लागला आहे .

९० ते १०० टक्के दरम्यान ४४ विद्यार्थी, विशेष गुणवत्ता प्राप्त २०५ विद्यार्थी, प्रथम श्रेणी प्राप्त १०५ विद्यार्थी, द्वितीय श्रेणी प्राप्त ६२ विद्यार्थी, तर तृतीय श्रेणी प्राप्त २४ विद्यार्थी आहेत. तसेच विद्यालयातून द्वितीय क्रमांक प्रणव प्रशांत सोनार यास ९७.२० टक्के तर तृतीय क्रमांक पाटील कुणाल जितेंद्र ९६.६० टक्के गुण प्राप्त झाले आहेत. पाटील भावेश नंदलाल यास ९५.४० टक्के तर बडगुजर यश किरण यास ९५ टक्के गुण प्राप्त झाले आहे. मुलींमध्ये सर्वप्रथम येण्याचा मान पाटील गायत्री शरद हिला मिळाला असून तिला ९४.८० टक्के तर उर्दू विभागातून सर्वप्रथम मो. शाहिद शकील खाटीक यास ८७.४० टक्के गुण प्राप्त झाले आहे. शाळेतील सर्व उत्तीर्ण व यशस्वी विद्यार्थ्यांचे चोपडा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व्ही सी गुजराथी, चेअरमन राजाभाई मयूर, उपाध्यक्ष मोरेश्वर देसाई, सचिव माधुरीताई मयूर ,संचालक चंद्रहासभाई गुजराथी, व सर्व संचालक मंडळ , तसेच मुख्याध्यापक डी.व्ही. याज्ञिक, उपमुख्याध्यापक आर.आर. शिंदे , उपप्राचार्य जे.एस. शेलार, पर्यवेक्षक जी.वाय. वाणी, आर. बी. पाटील, समन्वयक गोविंदभाई गुजराथी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले आहे.

Protected Content