रायसोनीत पंडीत नेहरूजींच्या व शिक्षकांच्या नृत्याने बालदिन साजरा

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बी.यू.एन. रायसोनी स्कूल प्रेमनगर येथे द्वीतीय सत्राच्या पहिल्याच दिवशी शिक्षकांच्या मदतीशिवाय उत्साही विद्यार्थ्यांनी पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या जीवनातील प्रसंग गोष्टीरूपाने सांगून सर्वांना भारावून टाकले, इयत्ता १ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांनी लकडी की काठी, इतनी सी हसी, बम बम बोले, गलती से मिस्टेक अशा विविध गाण्यांवर नृत्य सादर करुन सर्वांचे लक्ष वेधले.

बालदिन असल्याने प्रिया कोष्टी, नुतन सुरवाडकर, मोनिका निकम, मयुरी पाटील व पुजा कुलकर्णी या शिक्षकांनी नाट्य छटा व वेगवेगळ्या गाण्यावर नृत्य केले , त्यामुळे मुलांच्या आनंदाला उथाण आले. शाळेच्या पहील्या दिवशी सुत्र संचालन करणाऱ्या पुर्वा वर्मा व धवल निकम या चिमुकल्यांसोबत सर्वांचे कौतूक शाळेचे अध्यक्ष श्री. शिरीषजी रायसोनी व उपाध्यक्ष श्री. उमेदजी रायसोनी यांनी केले.

Protected Content