पावसाळ्यातही चोपड्यात 13 दिवसानंतर पाणीपुरवठा (व्हिडीओ)

chopss news

चोपडा प्रतिनिधी । शहरात मागे काही दिवसांपूर्वी १५ ते १६ दिवसांत पाणी येत होते. यासाठी शहरातील काही नागरिकांनी दि .९ जुलै रोजी आपलं सरकार या बेबसाईट वर ऑनलाईन तक्रार देवूनही १२ ते १४ दिवसात नळ येत आहे. तरी संबंधितांकडे तक्रार देऊन देखील चोपडा नगरपालिकेच्या कार्यभारवर कोणताही फरक पडलेला दिसत नाही. भरपावसाळ्यात शहरातील जनतेचे पिण्याच्या पाण्यासाठी अतोनात हाल होत आहे.

सविस्तर असे की, नगरपालिकेच्या कार्यकाळात अनेक लोक सत्तेवर बसले असतील अनेक पक्षाचे लोक सत्तेवर आले असतील, मात्र कार्यरत असणारी कार्यकारी मंडळ हे अकार्यक्षम आहे. तापीला महापूर असून, गूळ धारणावरून पाणी विसर्जित करत आहे आणि अश्या परिस्थितीही शहरातील जनतेला पाण्यासाठी अतोनात हाल भोगावे लागत आहेत. 12 ते 14 दिवसात पाणी येत आहे, मात्र यात नगरपालिकेचा पाईप कुठे फुटला आहे ? कुठे नळ सोडून पाणी गटारीत फेकले जात आहे ? कोणी गाड्या धुत आहे. याचे नगरपालिकेला सोयरसुतक नाही पाईप फुटला आहे. तेथून हजारो लिटर पाणी वाया जात आहे आणि काही कॉलनी मध्ये पाणी पोहचतच नाही असे चित्र पाहायला मिळते नगरपालिकेने गुळ धरणावरून अहोरात्र काम करून पाईप लाईन टाकून घेतली. आपण पाण्यासाठी किती प्रयत्नशील आहोत असे भासवून सत्ताधारी नगरसेवकांनी गुळवरून पाणी दिलेही. मात्र 15 ते 16 दिवसात आणि तापी नदीवरील कनेक्शनच तोडून दिले आता मात्र तापी फुल असताना देखील चोपडा नगरपालिका 12 ते 13 दिवसात पाणी पुरवत आहे. रावेर, धरणगाव, अमळनेर, यावल या सर्व नगरपालिका 3 ते 4 दिवसाआड पाणी पुरवठा करत आहे. शिरपूर नगरपालिका तर 24 तास शुध्दपाण्याचा पुरवठा करत आहे तर चोपडा नगर पालिकाच का 12 ते 13 दिवसात पाणी पुरवठा करत आहे ? असा प्रश्न जनतेसमोर आहे? ही पाणी टंचाई फक्त कृत्रिम असायला हवी अन्यथा नियोजनाचा अभाव असायला हवा कारण काहीही असो संयमी जनतेचा अंत पाहू नका, असा सवाल जनतेतून होत आहे. चोपडा नगरपालिका कोणत्याही सुविधा पुरविण्यास असमर्थ असून देखील काही सत्ताधारी नेते मात्र प्रसिद्ध झोतात असतात. तरी संयमी जनता असली तर वादळापूर्वी शांतता समजावी असे चित्र तरी चोपड्यात दिसत आहे.

Protected Content