जिल्ह्यातील लघुउद्योजकांना पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

purskar image

जळगाव, प्रतिनिधी । लघु उद्योग घटकांसाठी महाराष्ट्र शासनाने लघु उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील दोन लघु उद्योग घटकांना जिल्हा पुरस्कार योजना राबविण्यात येते. त्यानुसार जिल्हा उद्योग केंद्रातर्फे सन 2019 च्या जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

पुरस्काराचे स्वरुप
प्रथम पुरस्कार 15 हजार रुपये रोख, मानचिन्ह, शाल व श्रीफळ, द्वितीय पुरस्कार 10 हजार रुपये रोख, मानचिन्ह, शाल व श्रीफळ अशाप्रकारे आहे. सन 2019 च्या जिल्हा पुरस्कारासाठी सुक्ष्म व लघू उपक्रम हा 1 जानेवारी, 2016 पुर्वी जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव या कार्यालयाकडे स्थायी लघु उद्योग नोंदणी झालेला असावा. तसेच उद्योग घटक मागील दोन वर्षात सलग उत्पादनात असावा. यावषी राष्ट्रीय/आंतराष्ट्रीय व जिल्हा पुरस्कार मिळालेले आहेत असे घटक या पुरस्कारासाठी पात्र होणार नाहीत. उद्योग घटक वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.

जिल्हा पुरस्कारासाठी सर्वसाधारणपणे उद्योग घटकांची स्थिर मत्ता, उत्पादन व कामगार यांचेमधील वाढ, तंत्रज्ञान कौशल्य, उद्योजकाची पार्श्वभुमी, उद्योगासाठी निवडलेली जागा, उत्पादनात केलेला विकास व गुणवत्ता, आयात-निर्यात, नविन उत्पादनासाठी धडपड, घटकाचे व्यवस्थापन व अकाँन्टींग सिस्टीम, मशिनरीची सर्वसाधारण स्थिती, इमारत व यंत्रसामुग्रीची देखभाल, कामगारांसाठी कल्याणकारी योजना, अनु.जाती/जमातीचे उद्योजक 10 टक्के तसेच महिला उद्योजक 5 टक्के अधिक गुणास पात्र ठरतील. या पुरस्कारांसाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा उद्योग केंदाकडे 31 डिसेंबर, 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत उपलब्ध होतील या बेताने पाठवावेत. असे आवाहन साहेबराव पाटील, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्रातर्फे एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Protected Content