जळगावात ‘जलसाक्षरता व जैवविविधता’ विषयावर उद्या कार्यशाळा

जळगाव, प्रतिनिधी । जलसाक्षरता केंद्र, यशदा, पुणे यांच्यातर्फे पाण्याचे अंदाजपत्रक, भविष्याचा वेध घेवून पाण्याचा आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठीच्या उपाययोजना, जैवविविधता या विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन उद्या 19 डिसेंबर, 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन करण्यात आले आहे.

कार्यशाळेत यांची राहणार उपस्थिती
जलसाक्षरता व जैवविविधता या विषयावर आयोजित कार्यशाळेस जलसाक्षरता केंद्राचे कार्यकारी संचालक डॉ. सुमंत पांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन. पाटील, यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक प्रकाश मोराणकर, जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रसाद मते, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एल. एम. शिंदे, जलयोध्दा शिवाजीराव भोईटे, जलजागृती चळवळीचे जीवराज आमले, आर्ट ऑफ लिव्हींगचे सुधाकर टोके, नॅचरल फार्मिंगच्या डॉ. रंजना बोरसे आदि मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यशाळेस जलप्रेमी, जलदूत, जलसेवक, जलकर्मी तसेच पाणी, पर्यावरण व जैवविविधता क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था, व्यक्ती, विद्यार्थी, पर्यावरण प्रेमी व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन के. जे. आटाळे, उप कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Protected Content