बहिणाबाई चौधरी विद्यापीठात उद्या शिक्षक-पालक मेळावा

nmu new

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गणित विभागाच्यावतीने ‘शिक्षक-पालक मेळावा व ओपन डे’चे आयोजन उद्या मंगळवार १९ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले.

प्र.कुलगुरु प्रा.पी.पी.माहूलीकर हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंचावर अधिष्ठाता प्रा.ए.बी.चौधरी, गणितशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.एस.आर.चौधरी, गणित विभागाचे विभाग प्रमुख प्रा. किशोर पवार, डॉ.एच.एल.तिडके, डॉ.सी.टी.आगे, प्रा.पी.व्ही महाजन हे उपसिथत होते. यावेळी प्र.कुलगुरु प्रा.माहूलीकर यांनी पालकांनी मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करुन मुलींमधील सुप्तगुणांकडे विशेष लक्ष देऊन त्या दिशीने त्यांना पाठबळ द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी उपस्थित पालकांमधून रविंद्र खैरनार, अरुण राव यांनी मनोगत व्यक्त केले. तर विद्यार्थ्यांमधून लिना वारके, प्रियंका सैतवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यापीठाकडून मिळणाऱ्या सोयी-सुविधाबाबत पालकांनी यावेळी समाधन व्यक्त केले. सुरुवातीस गणित विभागाचे प्रमुख डॉ. किशोर पवार यांनी प्रास्ताविक केले. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्प ओपन डे चे आयोजन यावेळी करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या हाती देण्यात येऊन त्यांचे निरिक्षण करुन गुणदानाबाबत सविस्तर माहिती घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुभाष पवार यांनी केले. डॉ.तिडके यांनी आभार मानले.

Protected Content