‘कोती’ चित्रपटाचा शेवट समाजावर सोडला आहे- सुहास भोसले

kolti chitrapat news

जळगाव प्रतिनिधी । कोती चित्रपटाचा शेवट हा सुखद न करता तो समाजावर सोडला आहे. कारण समाजाने तृतीयपंथीय त्यांना स्वीकारताना त्यांना चांगल्या विचारांसह स्वीकारले पाहिजे अथवा त्यांना चित्रपट पाहताना आलेला अनुभव त्यांच्यात नवीन बदल घडवेल, असे कोती चित्रपटाचे दिग्दर्शक सुहास भोसले यानी व्यक्त केले.

यावेळी शिक्षण शास्त्र व शारीरिक शिक्षण महाविद्यालय प्राचार्य ए.आर.राणे, जनसंवाद व पत्रकारिता विभागप्रमुख प्रा. संदीप केदार, लोककलावंत विनोद ढगे, प्रा.दुष्यंत भाटेवाल उपस्थित होते. के.सी.ई.सोसायटी संचालित शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षण महाविद्यालय आणि जनसंवाद व पत्रकारिता या विभाग, मूळजी जेठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोती’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या ‘विशेष शो’चे आयोजन करण्यात आले होते.

या विशेष शो बघण्यासाठी जनसंवाद व पत्रकारिता विभागाचे प्राध्यापक, विद्यार्थी तसेच शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते, यावेळी मुक्त संवादात विद्यार्थ्यांनी तृतीयपंथी यांना जीवन जगताना येणाऱ्या अडचणी, समाजात होणारी अवहेलना कशी थांबवता येईल, तसेच चित्रपटाचा शेवट हा सकारात्मक का दाखविला आहे, या बद्दल प्रश्न विचारले असता यापुढे त्या संबंधीत व्यक्तीकडे बघण्याचा तुमचा दृष्टीकोन सकारात्मक झाला पाहिजे हा मागचा हेतू आहे असे त्यांनी मुक्तसंवादात सांगितले.राष्ट्रीय तसेच आंतरराष्टीय स्तरावर विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेला ‘कोती’ हा चित्रपट ८ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला होता. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया, दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल, गोवा फिल्म फेस्टिव्हल, कोल्हापूर फिल्म फेस्टिव्हल, केरळ फिल्म फेस्टिव्हल, संस्कृती कलादर्पण या सारख्या महोत्सवांत पाररितोषिके पटकावलेल्या तसेच कान्स व बर्लिन फेस्टिव्हलमध्ये आपली स्वतंत्र छाप उमटवलेल्या या चित्रपटात मनोरंजनातुन समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि त्यांच्याकडे पाहण्याची समाजाची ‘कोती’ मानसिकता. समाजातील तृतीयपंथी या उपेक्षित घटकाच्या बालपण तथा मानसिकतेचे यथार्थ चित्रण या चित्रपटात करण्यात आलेले आहे.

या ‘विशेष शो’ला शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे, मोहन चौधरी, डी.एड.विभागाचे प्राध्यापक व विद्यार्थी, प्रा केतकी सोनार, प्रा. प्रशांत सोनावणे, अभय सोनवणे, संजय जुमनाके, श्रीराम वाघमारे, सुबोध सराफ, अपूर्वा वाणी, पूजा पवार, सचिन हिवाळे,विलास बाविस्कर आदी उपस्थित होते.

Protected Content