गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएससी स्कूल येथे दहीहंडी उत्साहात

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव, याठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला गेला.

या उत्सवात सहभागी झालेल्या चिमुकल्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. चिमुकल्यांनी श्रीकृष्णाच्या जन्मापासून तर त्यांच्या रासलीला पर्यंत सर्वत्र सजीव वातावरण निर्माण केले. भगवान श्रीकृष्णाचे भक्त श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला उपवास करून जन्माष्टमी म्हणजेच श्रीकृष्णचा जन्मोत्सव साजरा करतात. श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करून आता भाविक दहीहंडी साजरी करण्यासाठी सज्ज होतात. ही प्राचीन परंपरा भगवान श्री कृष्णजींच्या सर्वात प्रतिष्ठित कार्यक्रमांपैकी एक आहे.

दहीहंडी म्हटली की मुलांचा उत्साह गगनात मावेनासा होतो. बाळगोपाळ श्रीकृष्णाच्या जन्मानिमित्ताने दहीहंडी मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते. श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती. कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहचण्यात यशस्वी होत असे. यासाठी त्याचे, मित्र त्याला मदत करत असत. या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रातच दहीहंडीचा उत्साह सर्वाधिक पाहायला मिळतो.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी राधा आणि कृष्ण यांचा वेश परिधान करून ‘गोविंदा आला रे’ चा जल्लोष केला. त्यामुळे आजूबाजूचा परिसर दुमदुमून गेला आणि सर्वत्र कृष्णमय वातावरण निर्माण झाले.

 

Protected Content