अॅड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे गोकुळाष्टमीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील अॅड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आलेत.

 

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त अॅड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये  बालगोपालांनी वेगवेगळ्या वेशभूषा सादर करीत विविध कार्यक्रम व नाटिका शाळेत घेण्यात आल्यात. या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे संचालक पराग पाटील, प्राचार्य विकास चौधरी, प्राचार्य प्रकाश महाजन  यांची प्रमुख उपस्थिती होती. बाळ गोपाळांनी श्रीकृष्ण आणि राधेच्या वेशभूषेत आपली भूमिका साकारली . श्रीकृष्ण राधा व सुदामा यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांनी त्यांची वेशभूषा परिधान करत मित्रतेवर आधारित नाटिका सादर केली. कृष्ण राधा व सुदामा यांच्या वेशभूषेत असलेल्या बाळगोपाळांचे चित्रीकरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी सूत्रसंचालन प्रा. अश्विनी चौधरी यांनी केले.  यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद यांनी कामकाज पाहिले.

Protected Content