Home क्राईम चाकूने वार करून मोबाईल लांबविणाऱ्यास अटक

चाकूने वार करून मोबाईल लांबविणाऱ्यास अटक

0
39


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धुळे शहरात एकाला चाकूने वार करून हातातील मोबाईल लांबविणाऱ्या संशयित आरोपीला कंजरवाड्यातून अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी धुळे पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

गोपाल गोपी रावळकर (वय-२१) रा. कंजरवाडा, जळगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  धुळे शहरात १८ मार्च रोजी दुपारी पृथ्वीराज मानसाराम पाटील रा. नकाने शाळेजवळ, धुळे हे पायी जात असतांना अज्ञात तीन जणांनी कुठे जात आहे असे सांगून त्यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्या हातातील महागडा मोबाईल व रोकड असा एकुण मुद्देमाल लांबविला होता. या प्रकरणी धुळे ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा जळगाव शहरात असल्याची गोपनिय माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस नाईक इम्रान सैय्यद, पोका गोविंदा पाटील यांनी संशयित आरोपी गोपल रावळकर याला अटक केली आहे. त्याने धुळे येथील गुन्ह्याची कबुली दिली आहे.  पुढील कारवाईसाठी त्यालपा धुळे पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


Protected Content

Play sound