खाजगीकरणावरील आक्षेप रेल्वेमंत्र्यानीं नाकारले ; गाड्या खाजगी , यंत्रणा रेल्वेचीच

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । खाजगीकरणावरील आक्षेप रेल्वेमंत्र्यानीं नाकारले असून  गाड्या खाजगी चालणार असल्या तरी  यंत्रणा रेल्वेचीच राहणार आहे  रेल्वेचे पूर्णपणे खाजगीकरण कधीच केलं जाणार नाही असंही रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

 

सरकारच्या मालकीच्या कंपन्यांचे खाजगीकरण करण्यावरुन विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्ना मागील काही काळापासू नसुरु केला आहे. दरम्यान याच संदर्भात आज केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी सरकारवर होणाऱ्या आरोपांना उत्तर दिलं आहे.

 

मंगळवारी लोकसभेमध्ये बोलताना गोयल यांनी देशातील सर्व रस्ते हे राष्ट्रीय मालमत्ता आहेत. मात्र कोणी असं म्हटलं नाही की या रस्त्यावर केवळ सरकारी गाड्या चालल्या पाहिजे. रस्ते राष्ट्रीय मालमत्ता असली तरी त्यावर खाजगी गाड्या चालत ना?, असा प्रश्न त्यांनी खाजगीकरणाला विरोध करणाऱ्यांना विचारलाय. रेल्वेच्या खाजगीकरणावरुन विरोधी पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या भाजपा सरकारच्या धोरणांसदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत .

 

मंगळवारी खाजगीकरणाच्या मुद्द्यावरुन लोकसभेमध्ये गोंधळ झाल्यानंतर रेल्वेमंत्री गोयल  अक्रामक झाल्याचे पहायला मिळालं. गोयल यांनी खाजगी रेल्वे गाड्या चालवल्या जणार असल्या तरी रेल्वे मार्ग आणि वाहतुकीसंदर्भातील यंत्रणा ही रेल्वेच्याच मालकीची राहणार असल्याचे संकेत दिलेत. खाजगी रेल्वे गाड्यांची खाजगी गाड्यांशी तर लोहमार्गांची रस्त्यांशी तुलना करुन गोयल यांनी रेल्वेच्या खाजगीकरणाचा मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न लोकसभेमध्ये केला.

 

रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे क्षेत्रामध्ये खाजगी गुंतवणुकीचं स्वागत केलं. “रेल्वेमध्ये खाजगी गुंतवणुकीचे स्वागत केलं पाहिजे. कारण असं झाल्यास अधिक चांगल्या सेवा उपलब्ध होतील,” असं गोयल यांनी म्हटलं. रेल्वेच्या योजना आणि रेल्वे प्रवासादरम्यानच्या सुरक्षेसंदर्भातही गोयल यांनी भाष्य करताना गुंतवणुक वाढल्यास प्रवाशांच्या सुरक्षेवर जास्त भर देता येईल.असे ते म्हणाले

 

. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये स्थलांतरित मजुरांसाठी सोडलेल्या विशेष रेल्वे गाड्यांचाही गोयल यांनी उल्लेख केला. “रेल्वेने प्रवासी मजुरांसाठी दोन कोटी अन्नाची पाकिटं मोफत वाटली. पाण्याच्या बाटल्याही मोफत वाटल्या. तसेच ४६०० श्रमिक विशेष ट्रेन चालवण्यात आल्या,” असं गोयल यांनी सांगितलं

Protected Content