सोनिया व राहूल गांधींच्या मालमत्तेची होणार चौकशी !

चंदिगड वृत्तसंस्था। हरियाणात असणार्‍या सोनिया व राहूल गांधी यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याचे आदेश तेथील राज्य सरकारने दिले आहेत.

याबाबत वृत्त असे की, हरियाणामध्ये २००५ ते २०१४ या काळात भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार होते. या काळात काँग्रेसच्या अनेक ट्र्स्ट आणि गांधी-नेहरू कुटुंबासाठी मोठ्या प्रमाणात मालमत्ता जमवण्यात आल्याचा आरोप आहे. यापैकी काही मातमत्तांची आधीपासून चौकशी सुरू आहे. आता केंद्र सरकारच्या पत्रानंतर गांधी-नेहरू कुटुंबाच्या इतर मालमत्तेच्या तपासाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

यासाठी एका समितीकडे तपास सोपवण्यात आला असून, ही समिती राजीव गांधी फाऊंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टच्या व्यवहारांचा तपास करणार आहे. यामध्ये मनी लाँड्रिंग आणि परदेशातून आलेल्या देणग्यांसह अनेक कायद्यांच्या कथित उल्लंघानाच्या प्रकरणांचा तपास केला जाईल. दरम्यान, या तपास समितीचे नेतृत्व ईडीच्ये एक विशेष संचालक करणार आहेत.

Protected Content