नवीपेठेत गटारीचे पाणी रस्त्यावर; परिसरात दुर्गंधी, महापालिकेचे दुर्लक्ष

जळगाव प्रतिनिधी । नवी पेठेतील सुभाष चौक को-ऑफ सोसायटी समोरील गटारी तुडुंब भरल्याने गटारीतील सांडपाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी येवून नागरीकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत संबंधित काम करणाऱ्या मुकडदम यांच्याकडून आज येतो उद्या येतो असे सांगून वेळ काढूपणा केला जात आहे. 

गोलाणी मार्केटजवळील नवीपेठ परिसरात असलेल्या सुभाष चौक अर्बन को-ऑप. सोसायटी समोरील गटरी गेल्या वर्षभरापासून साफ करण्यात आलेल्या नाहीत. अनेक महिन्यांपासून येथील स्थानिक रहिवाश्यांनी अनेक वेळा महापालिकेच्या आरोग्य विभागाला तक्रार करूनही हेतू पुरस्कर दुर्लक्ष केले जात आहे. दरम्यान, या परिसरातील साफसफाई करणारे मुकडदम अत्तरदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर दिले जात नाही. भर उन्हाळ्यात गटारीचे पाणी रस्त्यावर येत आहे. परिस्थिती पावसाळ्यातही मोठ्याप्रमाणावर होते.

नवी पेठेतील सुभाष चौक को-ऑफ सोसायटी समोरील गटार ही गेल्या वर्ष दोन वर्षांपासून साफ करण्यात आलेली नाही. गटारीत गाळ मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे संपुर्ण पाणी रस्त्यावर आले आहे. दुकानावर येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांची अडचण होते. यासंदर्भात स्थानिक रहिवाशी अमर चौरशीया यांनी महापालिकेत गटार साफ करण्यासाठी तक्रार दिली आहे. 

Protected Content