भारत -पाक सीमेवर शस्त्रसाठा पकडला

अमृतसर वृत्तसंस्था ।  भारत-पाकिस्तान सीमेवर पंजबामधील फिरोजपूर जिल्ह्यातील अबोहर येथे बीएसएफकडून एक शस्त्र तस्करीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा देखील हस्तगत करण्यात बीएसएफच्या जवानांना यश आले आहे.

बीएसएफच्या जवानांनी या कारवाईत, सहा मॅगझिन व ९१ राउंडसह तीन एके-47 रायफल्स, चार मॅगझिन व ५७ राउंडसह दोन एम-16 रायफल्स, चार मॅगझिन व २० राउंडसह दोन पिस्तुलं इत्यादी शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे.

भारतीय सुरक्षा संस्थाबरोबरच गुप्तचर संस्थांसमोर गुन्हेगारी व दहशतादाचे एक नवे रुप आले आहे. भारतीय सैन्य व गुप्तचर संस्थांच्या सर्तकतेमुळे पाकिस्तान, आयएसआय व दहशतवादी संघटनांना आपल्या कारवाया करण्यात अपयश येत आहे. यामुळे आता आयएसआय व दहशतवादी संघटनांनी भारतातील गुन्हेगारी जगताचा यासाठी वापर करणे सुरू केले आहे. देशात दहशतवादी कारवाया घडवण्यासाठी आता स्थानिक गँगस्टर्सवर जबाबदारी सोपवली जात असल्याचे दिसून येत आहे. शस्त्र तस्करीचा संबंध या दहशतवादी कारवाया घडवण्यासाठी देखील असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काही दिवसांअगोदर केंद्रीय गुप्तचर संस्थेच्या पंजाब युनिटने अलर्ट केले होते की, आयाएसआय आणि अन्य दहशतवादी संघटनांनी काही नेत्यांना निशाणा बनवण्यासाठी पाच गुंडाना काम सोपवले होते. सध्या या पाच पैकी दोघे फरार आहेत आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहे. तर उर्वरीत तिघे पंजाबमधील विविध तुरुंगात आहेत.हे गँगस्टर्स अनेक हत्या, लुटमार, अंमली पदार्थांच्या प्रकरणांमध्ये तुरुंगातून रॅकेट चालवण्यात सहभागी आहेत. स्थानिक पोलिसांना त्यांच्यावर नजर ठेवण्यास सांगण्यात आलेले आहे.

Protected Content