डॉ. आंबेडकर यांच्या बंगल्यावर हल्ल्या करणाऱ्यांना त्वरीत अटक करा; बोदवडात भाजपाचे निवेदन

बोदवड प्रतिनिधी । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृह’ इथे दोन अज्ञात व्यक्तींनी मंगळवारी रात्री हल्ला केला होता. या हल्ल्यातील आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी भाजपातर्फे तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले राजगृहावर ७ जुलै २०२० रोजी दोन अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड केली आहे. सोबत घरच्या काचाची दगडफेक झाली आहे यात घराच्या झाडाच्या कुंड्याची तोडफोड झाली आहे. राजगृह हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. साहेबांनी पुस्तक ठेवण्यासाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर येथे भेटीसाठी येत असतात इतके महत्वाचे स्थान आहे. तरी सदर घटनेचा भारतीय जनता पार्टी बोदवड तालुक्याच्या वतीने निषेध व्यक्त करीत संबंधित आरोपीचा शोध घेऊन तातडीने अटक करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. निवेदन देते वेळी भाजपचे बोदवड तालुकाध्यक्ष विनोद कोळी, सचिन राजपूत, प्रदीप बडगुजर, सुधीर पाटील, पंचायत समितीचे सभापती किशोर गायकवाड, रवी खेवलकर, किरण वंजारी, राम आहुजा, सलामोद्दीन सिरिजुद्दीन, भगतसिंग पाटील हे उपस्थित होते.

Protected Content