40 कुत्र्यांवर बलात्कार ! : निर्लज्ज आरोपी म्हणतो प्राण्यांना आक्षेप नाही, तर गुन्हा कसा?

 

मुंबई : वृत्तसंस्था । कुत्रीवर बलात्कार केल्याच्या गुन्हयात अटकेत असलेल्या मुंबईतील 68 वर्षीय वृद्धाने धक्कादायक दावे केले आहेत. मुक्या प्राण्यांना काही आक्षेप नसेल, तर तो गुन्हा होत नाही, असं निर्लज्ज उत्तर त्याने दिलं. आरोपी अहमद शाहीने आतापर्यंत 40 कुत्र्यांना विकृतीचे शिकार केल्याची भीती आहे.

 

अहमद शाहीने कुत्र्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उमटली होती. सोशल मीडियावरही #SorrySheru हा हॅशटॅग ट्रेण्डिंगमध्ये आला. अहमदला अटक झाल्यानंतर त्याच्याकडून आणखी धक्कादायक खुलासे झाले. त्याने आतापर्यंत 40 कुत्र्यांवर बलात्कार केल्याचा संशय आहे.

 

अहमद हा मुंबईतील जुहू गल्ली भागातील रहिवासी आहे. पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास तो हे भयंकर कृत्य करत असे. अहमद भाजी विक्रेता आहे. कुत्र्या-मांजरांना खाण्याच्या बहाण्याने तो जवळ बोलवत असे. त्यानंतर मुक्या प्राण्यांवर लैंगिक अत्याचार करत असे.

 

प्राण्यांना खायला देऊन त्यांच्यावर बलात्कार केल्याची कबुली आरोपी अहमदने चौकशीदरम्यान दिली. जर मुक्या प्राण्यांना काही आक्षेप नसेल, तर तो गुन्हा होत नाही, असं लंगडं समर्थन अहमदने दिलं. ‘बॉम्बे अॅनिमल राईट्स’ या एनजीओतील  प्राणी हक्क कार्यकर्ते विजय मोहनानी यांच्या तक्रारीनंतर डीएन नगर पोलिसांनी अहमदला अटक केली.

 

तक्रारदार विजय मोहनानी यांना अहमदच्या कृत्याविषयी फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने अहमद कुत्र्यांवर बलात्कार करत असल्याचा दावा केला. त्याच्याकडे पुरावे मागितले असता त्याने व्हिडीओ पाठवला. डिसेंबर 2020 मधील हा व्हिडीओ पाहून मोहनानी हादरले. हा व्हिडीओ त्यांनी डीएन नगर पोलिसांना दिला.

 

‘बॉम्बे अॅनिमल राईट्स’ एनजीओतील कार्यकर्ते जुहू परिसरातील कुत्र्यांची वैद्यकीय तपासणी करत आहेत. अत्याचार झालेल्या कुत्र्यांची यादी पोलिसांना सोपवली जाणार आहे. भूतदया नसलेल्या आरोपी अहमद शाहीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Protected Content