फैजपूर येथे 32 वा द्वि-दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद

फैजपूर, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषद मुंबई व धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोरोना नंतरच्या काळातील वाणिज्य आणि व्यवस्थापन क्षेत्रातील स्पर्धात्मक फायदे’ या विषयावर ‘द्वि-दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी फैजपूर येथे ‘महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेच्या राष्ट्रीय परिषदेत उद्घाटक म्हणून आपले विचार मांडत असतांना देशातील जनतेला पारंपरिक शिक्षणासोबतच आर्थिक आणि राजकीय दृष्टया साक्षर करण्याची गरज आहे. बालवाडी ते पदव्युत्तर शिक्षणातील सर्व स्तरावरील विद्वानांना प्रामुख्याने शिक्षकांना एकत्रित करून शैक्षणिक धोरण निश्चित केले पाहिजे. जे पदव्युत्तर स्तरावर शिकविले जाणार आहे. त्याची जाणीव बालवाडी पासूनच विद्यर्थ्यांना व्हावी म्हणून शिक्षणाची आखणी केली गेली पाहिजे.” असे सांगितले.

‘वॉरण बफेट’चे उदाहरण देऊन जीवनातील आर्थिक गणित जुडवून घेण्यासाठी नियोजनबद्ध गुंतवणूकीचे आणि बचतीचे महत्व पटवून दिले. तसेच शिक्षकांच्या मागण्यांवर प्रकाश टाकत शिक्षकांच्या समस्या ह्या समाजाच्या समस्या आहेत आणि त्या सोडविण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले.

शनिवार, दि.१२ मार्च २०२२ रोजी धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषद मुंबई व धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोरोना नंतरच्या काळातील वाणिज्य आणि व्यवस्थापन क्षेत्रातील स्पर्धात्मक फायदे’ या विषयावर ‘द्वि-दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

परिषदेचे अध्यक्ष सन्मा.शिरीषदादा चौधरी, आमदार रावेर-यावल विधानसभा व अध्यक्ष तापी परिसर विद्यामंडळ, यांनी आपल्या भाषणात स्व.बाळासाहेब चौधरी व थोर स्वातंत्र्य सेनानी स्व.धनाजी नाना चौधरी यांच्या कार्याचा गौरव करत ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण करून दिली. मुंबई येथील चेतना इन्स्टिट्यूटच्या स्थापनेमागील उद्देश सांगत असताना बहुशाखीय शिक्षण धोरण अवलंबले गेले पाहिजे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विषय निवडण्याचे स्वातंत्र्य दिले गेले पाहिजे, परंपरागत कला वाणिज्य विज्ञान असे शिक्षणाचे विभाजन केल्यामुळे न्यूनगंड निर्माण होतो म्हणून सार्वभौम सर्वंकष शिक्षण दिले गेले पाहिजे विद्यार्थ्यांच्या कला गुणांवर आधारित त्यांच्या आवडीवर आधारित शिक्षण दिले पाहीजे त्या दृष्टीने आराखडा तयार करून शिक्षणाचा चेहरा मोहरा बदलत एक नवीन शैक्षणिक क्रांतीची गरज समाजाला आहे.” असे मत मांडले.

प्रमुख अतिथी डॉ.उल्हास पाटील, माजी खासदार रावेर लोकसभा, यांनी फैजपूर ही अतिथींचा आदराने स्वागत करण्यासाठी सदैव तत्पर असलेली भूमी आहे असे सांगितले, राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या संस्थेने आणि संघटनेने केलेल्या कार्याचे कौतुक केले, व विकासाच्या दृष्टीने पावले उचलत असताना जिथे जिथे मदत लागेल तिथे मी संघटनेच्या पाठीशी आहे असे आश्वासन दिले.

या प्रसंगी प्राचार्य डॉ. पी. आर चौधरी यांनी आपल्या प्रास्ताविकात राष्ट्रीय परिसंवादाच्या आयोजानाचा उद्देश आणि भूमिका या विषयी माहिती दिली व फैजपुर येथील १९३६ चे ग्रामीण अधिवेशनात उपस्थित विभूती व लोकसेवक स्व.बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या स्मृतींना अभिवादन करून प्रस्ताविकाला सुरुवात केली, “परिसरातील जनतेला राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या सामाजिक आर्थिक तसेच राजकीय बदलांबद्दल माहिती मिळावी आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने या राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले” असे सांगितले.

डॉ.बी बी तायवाडे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषद, यांनी “महाराष्ट्र वाणिज्य परिषद केवळ सरकार कडे साकडे घालून मागण्या मागण्यासाठी स्थापन झालेली संघटना नसून परिषदेच्या माध्यमातून सतत विविध विषयांवर संवाद आणि संशोधन करून सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातात तसेच त्यांनी राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर परिषदेच्या माध्यमातून केलेल्या कामगिरीचा परिचय ही करून दिला.

महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेचे सह-सचिव जी.वाय.शितोडे यांनी ‘नवीन शिक्षण धोरण हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी अत्यंत धोक्याचे आणि शिक्षणाचे वाटोळे करणारे धोरण आहे.’ असे मत मांडत राज्यातील महाविद्यालयांमध्ये शिकवायला शिक्षक नाहीत म्हणून तासिका तत्वावर शिक्षकांच्या नियुक्त्या करून शिक्षकांना एकप्रकारे वेठबिगार करण्याचे कारस्थान चालले आहे. ही केवळ शिक्षकांचीच नाही तर संपूर्ण समाजाची आणि पवित्र समजल्या जाणाऱ्या शिक्षण क्षेत्राची थट्टा आहे असे परखड मत व्यक्त केले म्हणून लवकरात लवकर शिक्षक भरती करण्यात यावी अशी मागणी केली.

पुरस्कार

या प्रसंगी डॉ.माधवी कुलकर्णी यांना डॉ.पी.सी.शेजवलकर आणि कै महादेवराव तल्हार आदर्श शिक्षक पुरस्कार व प्रा.अशोक कोकाटे यांना सौरव शिवरे यांच्या स्मरणार्थ तरुण संशोधक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

सहयोगी सदस्य म्हणून निवड

याप्रसंगी महाराष्ट्र वाणिज्य पतिषदेच्या सहयोगी सदस्य म्हणून डॉ.अरविंद चौधरी, डॉ.माधवी कुलकर्णी, डॉ.एन.गुरव, डॉ.अजय भामरे, डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ अरुण गायकवाड, डॉ.कुलदीप शर्मा, डॉ.शिवप्रसाद डोंगरे, डॉ.निशिकांत झा, डॉ.ममताबेन पाटील यांची निवड करण्यात आली.

पुरस्कारासाठी देणगी

आमदार शिरीषदादा मधुकरराव चौधरी यांच्या तर्फे लोकसेवक स्व.मधुकरराव चौधरी जीवन गौरव पुरस्कार साठी परिषदेला एक लाख रुपये देणगी देण्यात आली डॉ.डी.एम.ललवाणी यांच्यातर्फे स्व.स्वप्नील ललवाणी, ‘तरुण समाजसेवी संशोधक प्राध्यापक पुरस्कारा’साठी एकावन्न हजार रुपये देणगी देण्यात आली.

सकाळी फैजपूर काँग्रेसच्या स्मृती प्रित्यर्थ निर्माण करण्यात आलेल्य प्रेरणास्थंभाची अभिवादन करून स्व. धनाजी नाना चौधरी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले, एन सी सी चे कॅडेट यांनी पाहुण्यांना गार्ड ऑफ ऑनर देऊन मंचाकडे आमंत्रित केले. सुरुवातीला दीप प्रज्वलन आणि मान्यवरांचे स्वागत-सत्कार करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजिय तांबे यांच्याहस्ते उदघाटन करून परिषदेची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष व रावेर-यावल विधानसभेचे आ.शिरीषदादा चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, डॉ.जी.एम.तल्हार, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषद, डॉ.बी बी तायवाडे,अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषद, डॉ.जी.वाय.शितोळे, डॉ.आर.के.टेलर, कार्यकारी अध्यक्ष तसेच लीलाधर चौधरी, चेअरमन, तापी परिसर विद्यामंडळ फैजपूर उपाध्यक्ष के.आर.चौधरी, मिलिंद वाघूळदे, एम.टी.फिरके, ओंकार सराफ, डॉ. एस.एस.पाटील, संजय चौधरी, प्रभात चौधरी, कुलदीप शर्मा, काँग्रेसचे युवा नेते धनंजय चौधरी, उपप्राचार्य व परिषदेचे समन्वयक डॉ.ए.आय.भंगाळे, डॉ.जी.जी.कोल्हे, प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील, प्राचार्या डॉ.पिंगला धांडे, डॉ.महेश जोशी, डॉ.जे के शर्मा, डॉ.जयश्री सूर्यवंशी, डॉ.शिवप्रसाद डोंगरे, डॉ.डी.एम.खंडारे, डॉ.निषिकांत झा, प्रा.एस.जे.पाटील, तापी परिसर विद्यामंडळ फैजपूर संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. रवी केसूर, डॉ.निखिल वायकोळे, डॉ. आरती भिडे, प्रा. सचिन भिडे व महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.राजश्री नेमाडे, डॉ.आर.आर.राजपूत, डॉ.सीमा बारी यांनी केले तर आभार डॉ.बी.बी.तायवाडे यांनी मानले.

Protected Content