जळगाव टोलनाक्याजवळील गोडाऊनला आग (व्हिडिओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव टोलनाक्याच्या बाजूला शिवशाही हॉटेलजवळ कपाशीच्या गोडाऊनला सहा सव्वा सहाच्या सुमारास भीषण आग लागली. महानगरपालिकेचे दोन बंब पोहोचून आज विझवण्याचा प्रयत्न करत असतानाच तिसरा बंबा तिथे पाचारण करण्यात आले आहे.

 

कुसुंबा शिवारात जळगाव टोलनाक्या जवळील गोडावूनला सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे वृत्त कळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन बंब पोहचले होते. त्यांचे आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु होते. हे गोडाऊन कपाशी किंवा प्लास्टिक दाण्याचे असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आगीचे लोळ दुरूनही नजरेश पडत होते. दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा आग विझविण्यासाठी तिसरा बंब देखील रवाना झाल्याची माहिती अग्निशमन अधीक्षक शशिकांत बारी यांनी दिली.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/675754093739569

 

Protected Content