कोलकाता येथे ९७१ खेळाडूंचा लिलाव

ipl nilav

 

कोलकाता वृत्तसंस्था । आयपीएल स्पर्धेचे आतापर्यंत १२ हंगाम खेळवण्यात आले आहे. तर १३व्या हंगामासाठी १९ डिसेंबर रोजी कोलकाता येथे लिलाव होणार आहे. या लिलावात ९७१ क्रिकेटपटूंचा समावेश असेल. यापैकी ७१३ भारतीय आणि २५८ परदेशी खेळाडू असणार आहेत.

गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही आगमी लिलावाच्या आधी युवराज सिंह, बेन कटींग, एविन लुईस, जेसन बेहरनडॉर्फ, बरिंदर सरन सह आणखी काही खेळाडूंना करारमुक्त केले आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्सकडे आगामी हंगामासाठीच्या लिलावाकरता केवळ १३.०५ कोटी रुपयेच शिल्लक राहिलेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्सने आरसीबीचा फलंदाज मिलींद कुमारला चाचण्या (सरावाकरता) बोलावलं आहे. सध्या त्रिपुरा संघाकडून खेळणाऱ्या मिलींदने आयपीएलमध्ये बंगळुरु आणि दिल्ली संघांचं प्रतिनिधीत्व केलं आहे. मात्र आतापर्यंत एकाही सामन्यात त्याला संधी मिळालेली नाही. मात्र रणजी क्रिकेटमध्ये केलेल्या आश्वासक कामगिरीनंतर मुंबई इंडियन्सच्या प्रशासनाने मिलींद कुमारवर बोली लावण्याचा विचार केलेला आहे.

Protected Content