९९ टक्के शिवसैनिकांना संजय राऊत खटकतात – निलेश राणे

मुंबई – शिवसेनेत ९९ टक्के लोकांना संजय राऊत खटकतात असा टोला माजी खासदार निलेश राणेंनी ट्विटच्या माध्यमातून लगावला आहे. तसेच संजय राऊत यांना नेते किंमत देत नाहीत अशी टीकाही निलेश राणेंनी केली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा माजी खासदार निलेश राणेंनी टीका केली आहे.  राणेंनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आधी CAA नंतर कृषी बिल, दोन्ही वेळेला लोकसभेत समर्थन राज्यसभेत विरोध याचं कारण, शिवसेनेचे लोकसभेचे खासदार राऊतला किंमत देत नाही व नेता मानत नाही. संज्या ९९% शिवसैनिकांना खटकतो म्हणून संधी मिळेल तेव्हा ते संज्याला फाट्यावर मारतात आणि पक्ष भूमिका राहते बाजूला अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. तर नाणार प्रकल्प व एमआयडीसी राजापूर या दोन्ही प्रकल्पांच्या जमीन घोटाळा प्रकरणी उद्या पत्रकार परिषद घेणार आहे. जमीन व्यवहारात मोठा भ्रष्टाचार कोण करतंय रत्नागिरी जिल्ह्यात हे नावासकट उद्या बाहेर काढणार असा इशाराही त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

तसेच संजय राऊतांसारखा भंगार माणूस कुणी नाही. कारण परिस्थिती अंगावर आली हे लक्षात आलं की, फक्त मराठी अमराठी वाद लावून द्यायचा की लोग आपोआप स्वत:ला वाटून घेतात आणि शिवसेनेचं काम सोपं होतं. मराठी माणसाने आतातरी यांची चाल ओळखावी आणि संधी मिळताच यांना आडवं करावं असा आरोपही निलेश राणेंनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर केला होता.

Protected Content