हिंदू राष्ट्रवाद भारताला आर्थिक विकासाच्या मार्गावरुन भरकटवण्याचे काम करेल : राजन

rajan

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सरकारने राष्ट्रीय आणि धार्मिक महापुरुषांचे मोठे पुतळे उभारण्याऐवजी आधुनिक शाळा आणि विद्यापीठं उभी केली पाहिजेत. हिंदू राष्ट्रवाद फक्त सामाजिक तणाव वाढवणार नाही, तर भारताला आर्थिक विकासाच्या मार्गावरुन भरकटवण्याचे काम करेल, असे मत रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे.

 

इंडिया टुडे मॅगजिनमध्ये लिहिलेल्या एका लेखात रघुराम राजन यांनी आपले परखड मत मांडले आहे. राजन यांनी आपल्या लेखात म्हटलेय की, सरकारने राष्ट्रीय आणि धार्मिक महापुरुषांचे मोठे पुतळे उभारण्याऐवजी आधुनिक शाळा आणि विद्यापीठं उभी केली पाहिजेत. यामुळे लहान मुलांना चांगलं शिक्षण देत त्यांना सहिष्णू आणि इतरांप्रती आदर व्यक्त करणारे म्हणून घडवण्यास मदत मिळेल. तसेच उद्याच्या स्पर्धात्मक जगात ते स्वत:चा टिकाव धरु शकतील, असे म्हटले आहे.

Protected Content